स्त्री-पुरुषांमधील विषमत्तेची रेषा ५० वर्षांपूर्वी शांताबाई यांनी पुसून टाकली. त्यांनी विविध अडचणींवर मात केली. आपल्यातील वेगळी स्त्री त्यांनी बाहेर काढली. म्हणूनच शांताबाई थेट दिल्लीला पोहोचल्या.
यशोभूमी या दिल्ली येथील प्रदर्शनात भारतातील प्राविण्य मिळवणाऱ्या 12 बलुतेदारांना पंतप्रधान मोदींनी बोलवले होते. महाराष्ट्रातून केवळ शांताबाई यांची निवड संपूर्ण मराठी जनासाठी गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे.
ही कहाणी आहे एका जगावेगळ्या स्त्रीची जी फक्त जिद्दीने उभी राहिली नाही तर आयुष्यात कठीण प्रसंगाला कस तोंड द्यायचं याच सर्वोत्तम उदाहरणचं तिने जगासमोर ठेवलं.शांताबाई श्रीपती यादव कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज तालुक्यातील हसूर सासगिरी खेडेगावामधील ही स्त्री.
आरळगुंडी ता भुदरगड येथील शांताबाईचं वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांच लग्न झालं. तिचे वडील नाभिक व्यवसाय करत होते आणि पती श्रीपती हे देखील नाभिक होते.
श्रीपती कोल्हापूर जिल्ह्यातील आरदाळ गावात त्यांच्या व त्यांच्या चार भावांच्या मालकीच्या तीन एकर जमिनीवर शेती करायचे. आपल्या उत्पन्नाला पूरक म्हणून ते नाभिक म्हणूनही काम करत असे. पण लवकरच, तीन भावांनी आपापसात तीन एकर जमीन वाटून घेतली. श्रीपतीकडे शेतीसाठी एक एकरपेक्षा कमी जमीन असल्याने, ते नाभिक व्यवसायासाठी इतर गावांमध्ये जाऊ लागले . तरीही उदरनिर्वाह करणे कठीण झाले आणि श्रीपतीला सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले.
हसूरसासगिरी गावचे अध्यक्ष हरिभाऊ कडूकर यांनी श्रीपतीची कठीण परिस्थिती पहिली आणि त्यांना हसूरसासगिरी येथे स्थलांतरित होण्यास मदत केली. त्या गावात न्हावी नसल्याने श्रीपतीला चांगली कमाई होण्याची चांगली शक्यता होती.
आणि म्हणून, शांताबाई आणि श्रीपती नवीन जीवन सुरू करण्यासाठी हसूरसासगिरीला आले. पुढील 10 वर्षांत शांताबाईंनी सहा मुलींना जन्म दिला, त्यापैकी दोन लहानपणीच मरण पावल्या. तथापि, श्रीपती नाभिक व्यवसायातून चांगली कमाई करत होते आणि आपल्या कुटुंब चालवत होते. पण 1984 मध्ये श्रीपतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला यावेळी त्यांच्यामागे ४ मुली होत्या., मोठी मुलगी ८ वर्षाची तर सर्वात छोटी मुलगी अवघ्या ६ महिन्याची होती . शांताबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला , तीन महिने शांताबाईंनी रोज आठ तास शेतमजूर म्हणून काम केले. दिवसाअखेरीस त्याला त्याच्या पाठीमागच्या मेहनतीचे 50 पैसे मिळायचे, पण त्याच्या चार मुलींना पोट भरण्यासाठी पुरेसे नव्हते.
तिच्या पतीच्या मालकीच्या जमिनीसाठी सरकारने तिला 15,000 रुपये दिले. शांताबाईंनी ते पैसे श्रीपतीचे कर्ज फेडण्यासाठी वापरले. पण तरीही मुलांना पोटापाण्यासाठी संघर्ष करावा लागला. तीन महिने शेतात कष्ट केले. काही दिवस ती तिच्या कुटुंबासाठी दिवसातून दोन वेळचे जेवण मिळवायची पण इतर दिवस काहीच नसायचे. शेवटी तिने हार मानली आणि त्यांनी आपल्या चार मुलींसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला .
मात्र यावेळी पुन्हा हरिभाऊ कडूकर यांनी त्यांना जीवनदान दिले . आणि त्यांनी शांताबाईला पतीचा व्यवसाय स्वीकारण्यास सुचवले. श्रीपतीच्या मृत्यूनंतर गावात एकही केशकर्तनालय नव्हते आणि गावची गरजही होती . इथूनच शांताबाईंनी नाभिक व्यवसायाचे हत्यार खेळवण्यास सुरुवात केली .
खर तर २१व्या शतकात हे सोपं नाही तरीसुद्धा या माउलीने हे करायची तयारी दर्शवली आणि करून सुद्धा दाखवलं. गावातील एक मोठे गृहस्थ सर्वप्रथम त्यांच्याकडे आले. ब्लेड लागेल किंवा कुठे जखम होईल याची तमा न बाळगता त्यांनी याची सुरुवात केली.उप सभापती हरिभाऊ कडुकर अस या गृहस्थाचं नाव.हरिभाऊंना याची जाणीव होती जर आपण याची सुरुवात केली तर बरेच लोक शांताबाईकडे येऊ लागतील व ज्या गरिबीच्या वेदना त्या सहन करत आहेत त्या काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होईल.
१९८५ सालापासून कधी पायी तर बैलगाडीने प्रवास करत शांताबाई आजूबाजूच्या खेड्यामध्ये जाऊन दाढी व कटिंग चा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत केला.दाढी – कटिंग, म्हैसी बोडणे असा व्यवसाय करूनच शांताबाईनी चारही मुलींची लग्न केली. आज वयाच्या ७३ व्या वर्षी शरीर साथ देत नसल्याने व्यवसाय बंद केला आहे . आज शासनाने शांताबाईंच्या कामाची दखल घेतली पण ती केवळ हार तुऱ्यापुरती मर्यादित राहिली . शासनाकडून मिळणारी ७०० रुपयांची मदतही त्यांना कधी कधी मिळत नाही . अत्यंत कष्टातून गरिबीतून वर येऊन या माऊलीने स्त्री पुरुष विषमतेची रेषा पुसण्याच काम ४ वर्षापुर्वी केलं पण शांताबाईंच्या नशिबी अजूनही कष्टाचे भोग आहेत . शांताबाईंच्या पडत्या काळात त्यांना एक पक्क घर आणि उदरनिर्वाहासाठी पेन्शन दिली तर नक्कीच आयुष्यातील काळ त्या सुखाने राहतील .